पारदर्शक, सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह मतदार यादीसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण (SCEA) मान्यताप्राप्त आधुनिक उपाय
कार्यक्षम आणि त्रुटीरहित निवडणूक प्रक्रियेची सुरुवात सहकारी संस्था, निबंधक कार्यालय आणि मतदार यांच्यासाठी एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्म
डिजिटल व्होटर्स लीस्ट (DVL) ही एक सुरक्षित, वेब-आधारित Software-as-a-Service (SaaS) प्रणाली आहे. ही प्रणाली मतदार यादीच्या कार्यक्रमाची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने स्वयंचलित, सुलभ व केंद्रीकृत करते.
DVL प्रणाली सहकारी संस्था, निबंधक कार्यालये, SCEA आणि सदस्य/मतदार या सर्व भागधारकांना एकाच व्यासपीठावर जोडते.
वैशिष्ट्ये आणि फायदे,
निवडणूक कायदा आणि नियम यानुसार बिनचूक
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांनी संकल्पित केलेल्या आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली विकसित केलेली DVL प्रणाली
अनुपालन
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण च्या सर्व नियमांशी पूर्ण सुसंगत.
सुरक्षा
पासवर्ड संरक्षण, आणि रोल-बेस्ड ऍक्सेस.
वापरकर्ता-अनुकूलता
24/7 ब्राउझर-आधारित प्रवेश. मराठी व इंग्रजी भाषा समर्थन (युनिकोड).
स्वयंचलित PDF डिजिटल मतदार यादी
डेटाबेसमधून थेट निर्मिती, सर्चेबल, वाचनसुलभ, पर्यावरणस्नेही, आणि छपाई-योग्य.
द्रुत वितरण व प्रवेश (Quick delivery and access)
कमी size च्या PDF डिजिटल मतदार याद्या ईमेल किंवा मोबाइलवर सहज वितरित/शेअर करणे सोपे.
QR कोड शोध सुविधा
पटकन वेबसाइट वर थेट शोध, मतदारांचा विश्वास वाढविणारी तंत्रज्ञान-आधारित प्रणाली.
खर्च बचत
छपाई, भौतिक संचयन आणि वाहतुकीचा खर्च कमी होतो. सहकारी संस्था आणि निबंधक कार्यालयांवरील प्रशासकीय भार कमी होतो.
वेळ बचत
प्रारूप व अंतिम मतदार यादी त्वरित तयार करता येते. पडताळणी, दुरुस्ती व मान्यतेसाठी लागणारा वेळ खूपच कमी होतो. सर्व संबंधितांकडून रिअल टाइममध्ये डेटा पाहता येतो, निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगवान होते.
श्रम बचत
स्वयंचलित कार्यप्रवाह - कंटाळवाणी मॅन्युअल, पुनरावृत्ती होणारी कामे वगळता येतात. इन-बिल्ट व्हॅलिडेशनमुळे चुका कमी होतात. स्कॅनिंग, रीटाइपिंग किंवा प्रत्यक्ष सबमिशनची आवश्यकता नाही / कमी. सोसायटी, मतदार आणि निबंधक कार्यालय यांच्यातील सुरळीत समन्वयामुळे त्रास कमी होतो.
